परिवर्तन सामाजिक संस्था पुणे ही संस्था २०११ सालापासून सामाजिक क्षेत्रात रचनात्मक कार्य करीत आहे. 'विद्यार्थी आणि शिक्षण' या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. पुणे, सातारा, बीड आणि मुंबई या चार जिल्हयातील ग्रामीण व मागासलेल्या भागातील शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप, संगणक कक्ष, ग्रंथालय आदि उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.
विद्यार्थी आणि शिक्षण केंद्रबिंदू मानून परिवर्तन संस्थेतर्गत मागील १२ वर्षापासून करण्यात आलेली कार्य व राबवण्यात येणारे उपक्रम -
• २०१९ साली 'शाळा तेथे ग्रंथालय' या थीम अंतर्गत परिवर्तन संस्था, ग्यान कि लायब्ररी आणि एस. बालन समूह यांच्या संयुक्त विद्यमाने 'सातारा जिल्हा पुस्तकांचा जिल्हा' - या उपक्रमाने संस्थेने विक्रम नोंदविला आहे. या अंतर्गत साताऱ्यामधील सर्व १०९७ शाळांना ग्रंथालये दिली गेली आहेत.
● 'सायकल अभियान' अंतर्गत आजवर संस्थेने १.५ कोटी रूपयांच्या सायकलींचे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी- विद्यार्थीनींना सायकल वाटप केले आहे.
• पुण्यात 'सायकल बँक योजना' अंतर्गत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलस् देवू केल्या आहेत.
'शाळा पुस्तकांच्या पलीकडे' कार्यक्रमातर्गत ग्रामीण भागातील शालेय जीवनामधील पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी सुध्दा लैंगिक शिक्षणाचे धडे व या विषयी जन जागृतीपर प्रबोधन कार्यशाळा संस्थेने आयोजित केल्या आहेत.
• 'येथे रुजवली जातात, युवा नेतृत्वाची मूल्ये' या थीमतर्गत परिवर्तन संस्था राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद आयोजित करीत असते.
• २०१७ आणि २०१८ साली ही परिषद आयोजित करण्यात आली होती. रचनात्मक कार्य, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, माध्यम, साहित्य पर्यावरण आदि विषयांवरील तज्ञ मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या संवादासाठी आमंत्रित केले जाते.
• परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यभरातील निवडक सामाजिक जाण आणि भान असलेले ३५० विद्यार्थी विद्यार्थीनींचा सहभाग घेतात. या पीढीमध्ये नेतृत्वाचे नवे मूल्य रुजवली - जातात.
• परिवर्तन या वर्षीची 'परिवर्तन युवा परिषद' दिनांक २५ व २६ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे येथे होत आहे.
• परिवर्तन सामाजिक संस्था 'शिक्षण व विद्यार्थी' हा विषय घेऊन सेवाभावी तत्वाने कृतीशील व रचनात्मक उपक्रम राबविण्याचा संस्था कायम नम्रपणे व प्रांजळपणे प्रयत्नात आहे.
© Copyright 2023 All Rights Reserved